मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रात भाजपची झालेली नाचक्की पाहून पक्षाचे माजी खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरून ”सौ सुनार की…एक पवार की” या शब्दांमध्ये खिल्ली उडविली आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी अलीकडेच भाजप नेतृत्वावर हल्लाबोल करून भाजपचा त्याग केला होता. त्यांनी सातत्याने मोदी आणि शहा यांची धोरणे आणि निर्णयांवर टीका केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय घटनांवरदेखील त्यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रात भाजपने सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यासाठी अजित पवार यांना हाताशी धरून रात्रीतून राष्ट्रपती राजवट काढून भल्या पहाटे शपथविधी उरकण्यात आला. तथापि, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दणक्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना फक्त ८० तासांमध्ये आपापल्या पदांचे राजीनामे द्यावे लागले. यानंतर महाविकास आघाडीचे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज शपथविधी घेत आहे. या पार्श्वभूमिवर, शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी एका ट्विटमध्ये एक मजेशीर ग्राफीक्स शेअर केले असून यात ”सौ सुनार की…एक पवार की” असे दर्शविण्यात आले आहे. यात मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यावर पवार यांनी मात केल्याचे दर्शविण्यात आले आहे. सिन्हांचे हे ट्विट अनेक राजकीय नेत्यांसह अन्य युजर्सनी रिट्विट केले असून यावर अतिशय भन्नाट अशी चर्चादेखील रंगली आहे. अर्थात, या सर्व प्रकरणात शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिमादेखील मोठ्या प्रमाणात उजळ झाल्याचे दिसून येत आहे.
खाली पहा शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेले ट्विट.
#AhmedPatel & of course lucky mascot, #SoniaGandhi. Helmed by the great Maharashtra/all India leader, the iron man of today, #SharadPawar was bound to yield this outcome. They have managed to pull the rug under the feet of the Centre/Guv making them fall flat, stumped pic.twitter.com/XcrwByORr0
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 27, 2019