जळगाव प्रतिनिधी । येथील अण्णासाहेब जी. डी बेंडाळे महिला महाविद्यालयात आज (दि. 21 जुन) रोजी सकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. राणे यांनी प्रत्यक्षात योगाचे प्रशिक्षण दिले असून, त्याचबरोबर मानवी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे. योगामूळे निरोगी जीवन जगता येईल.तसेच शारीरिक व मानसिक आनारोगाचे निवारण व्हावे, यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातही योगाचे महत्त्व वाढत असून जनतेमध्ये योगाची क्रेझ वाढतांना दिसत आहे. शालेय जीवनापासून योगाचे महत्त्व रुजविण्याची गरज आहे. या धावपळीच्या युगात योगाला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. त्याचबरोबर ते मानसिक ताण-तणाव दूर राहण्यासाठी योगा एक महत्वाची भूमिका बजावत असतो. असे योगाचे महत्त्व सांगत, त्यांनी जमलेल्या शिक्षक, कर्मचारी व नागरिकांनाकडून दीडतास योगा करुन घेतला आहे.