शरद पवार यांची उद्या एरंडोल येथे जाहीर सभा

 

pawar and devkar

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाई व मित्रपक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या एरंडोल येथे जाहीर सभा घेणार आहेत.

 

राष्ट्रवादी पक्षाने स्टार प्रचारक म्हणून थेट शरद पवार यांना प्रचारात आणून आघाडी घेतली आहे. एकीकडे भाजपच्या वतीने उमेदवार बदलण्यात आला असतांना राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करून सतर्कता दाखवली आहे. ही सभा शुक्रवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता मरिमाता चौकातील महात्मा फुले शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सभेला हजर रहावे,असे आवाहन उमेदवार गुलाबराव देवकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content