कठीण काळात शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही – अनिल देशमुख

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी शरद पवार गटात परत येण्यासाठी जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करीत आहे. पण, कठीण काळात शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घ्यायचे नाही असे ठरले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी शनिवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली. शरद पवारांना कठीण काळात सोडून गेले, अनेकांनी वैयक्तिक टीका केली, ते आमच्या डोक्यात आहे, असे ते म्हणालेत.

आम्हाला सोडून गेलेले चलबिचल झाले आहे. वर्षभरापूर्वी त्यांचा निर्णय चुकला असेल. पण, आताही त्यांना राजकीय भवितव्य आहे. अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात आहे. चार महिन्यांनी निवडणूक असल्याने त्यांना चिंतेने ग्रासले आहे. जेमतेम लोकसभा निवडणूका झाल्या आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा होईल. कोण, कुठे लढेल यावर सध्या चर्चा नाही, असे ते म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यामुळे शिवसेना शिंदेगटाचा रामटेकमध्ये पराभव झाल्याचा आरोप कृपाल तुमाने यांनी केला आहे. कृपाल तुमाने १० वर्ष खासदार होते. म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली असेल. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. शिंदे गटाने काँग्रेस आमदाराला आणून तिकीट दिले. पण निवडून आणू शकले नाही असे देशमुख म्हणाले.

बावनकुळे यांनी आता तरी जमिनीवर यायला हवे. १८ हजाराने काँग्रेसचा उमेदवार त्यांच्या मतदारसंघात पुढे आहे. बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिले पाहिजे. यांचा आम्हाला फायदा होईल असा टोला देशमुख यांनी हाणला. प्रतिभा धानोरकर दीड लाख मतांनी निवडून आल्या. पंतप्रधान इतक्या कमी मताने निवडून आले. जास्त मते मिळाली त्यांना पंतप्रधान करावे ही मागणी योग्यच आहे.

Protected Content