अकोला (वृत्तसंस्था) मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. या सरकारला घालविल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही,’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला ठणकावून सांगितले आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात वाडेगावात राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम गावंडे, मूर्तिजापुरात रविकुमार राठी तर वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथे कारंजा मतदारसंघातील प्रकाश डहाके यांच्या प्रचारार्थ सोमवारी पवार यांनी सभा घेतल्या. वाडेगावातील सभेत पवार म्हणाले,इंदिरा गांधींच्या काळातही युद्ध झाले होते. त्यांनी तर पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकूनदेखील त्याचे श्रेय घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे आता भाजप सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही, असे देखील श्री. पवार म्हणाले.