राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक ; शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री?

4Sharad 20Pawar 201 3

मुंबई (वृत्तसंस्था) युतीला सत्तास्थापनेत अपयश आल्यास, आघाडीकडून शरद पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतील. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेना आणि काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर यानिमिताने आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होत, सत्तेचे ५०-५० टक्के वाटप होईल.

 

शिवसेनेला पाठिंबा द्यावा, यासाठी काँग्रेसचे काही नेते आग्रही आहेत. पण शिवसेनेला थेट पाठिंबा देऊन अडचणीत येण्यापेक्षा काँग्रेसला राष्ट्रवादीला पाठिंबा देणे सोप जाईल. काँग्रेस सत्तेत सहभागी होणार नाही, पण बाहेरून पाठिंबा देईल. तसेच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०-५० टक्के सत्तेचे वाटप होईल. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याने शिवसेना पाठिंबा देण्याबाबत त्यांच्यावरही टीका होणार नाही. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार आणि त्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, अशी जोरदार चर्चा चर्चा सुरु आहे. याआधीही विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे, असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी करून चर्चेला उधाण आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत बैठक करत शरद पवार हे दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

Protected Content