मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज, विजयादशमीच्या मुहूर्तावर दुसऱ्या टप्प्यातील दौरा सुरू होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी मुंबईत देण्यात आली.
यासंदर्भात माहिती अशी की, पहिल्या टप्प्यात शरद पवार हे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. पहिल्या टप्प्यात शरद पवार यांनी उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा प्रचार दौरा केला. आता दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरपर्यत ते प्रचारसभा घेणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११. ३० वाजता, पारोळा सायंकाळी ५ वाजता, ९ ऑक्टोबर रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी ११. ३० वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा कारंजा दुपारी ४ वाजता, १० ऑक्टोबर रोजी हिंगणघाट सकाळी १०. ३० वाजता, बुटीबोरी हिंगणा ३ वाजता, काटोल ५ वाजता आदी ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.