Home राजकीय घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत गेल्याचे स्वतः डोळ्यांनी पाहिलंय : शरद पवार

घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत गेल्याचे स्वतः डोळ्यांनी पाहिलंय : शरद पवार


201901030129206563 NCP Chief Sharad Pawar pays tribute to Ramakant Achrekar SECVPF
 

सातारा (वृत्तसंस्था) घड्याळाचे बटन दाबले तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिले आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

शरद पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, एकेदिवशी हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी माझ्या समोर ईव्हीएम मशिन ठेवली. त्यानंतर मला बटन दाबायला सांगितले. परंतु घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत गेले. सगळ्याच मशीनमध्ये असे असेल असं मी म्हणत नाही, मात्र मी हे पाहिलेले आहे. म्हणून मी काळजी व्यक्त केली, असे पवार म्हणाले. यासाठी आम्ही कोर्टात गेलो, मात्र दुर्दैवाने कोर्टाने आमचे म्हणणे ऐकले नाही, असेही पवार यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound