यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील नगर परिषद अंतर्गत सुरू असलेली प्रधानमंत्री आवास योजना ही लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी मोठया आर्थिक संकटात सापडलेला असून नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या विषयाची दखल न घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल असा ईशारा पक्षाचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात केन्द्र शासनाची महत्वकांक्षी अशी प्रधानमंत्री आवास ही योजना सन २०१९ सुरू करण्यात आली आहे. यावल शहरातुन या योजनेत ३५६ लाभार्थींचे प्रस्ताव मंजुर करण्यात आली होती. दरम्यान या ३५६ घरकुलांपैकी २५२ घरकुलांची कामे सुरू असुन प्रगतीपथावर आहे तर यातील १५५ घरकुले ही पुर्ण झाली आहे तसेच उर्वरीत ९७ घरकुले हे पूर्णत्वास असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या९७ लाभार्थ्यांचे हप्ते मागील मार्च २०२३ पासुन आजपावेतो मिळालेली नाही. यातील काही लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता तर काहींचा तिसरा हप्ता व काहींचा शेवटा हप्ता मिळत नसल्याने सदरचे लाभार्थी हे सामान्य कटूंबातील असुन, त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडून अनुदान मिळणार यामुळे लाभार्थ्यांनी उसनवारी पैशांची उचल करीत जुळवा जुळवी करून आपल्या घरकुलांची कामे पुर्ण केली आहे.
दरम्यान त्यांना सदरील योजनेतुन मिळणारे हप्ते मिळत नसल्याने घरकुल लाभार्थी चांगलेच अडचणीत आले असुन , प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात घरकुलांचे लाभार्थी व आपण स्वता : वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाकडे विचारणा केली असता या ठीकाणी संबंधीत अधिकाऱ्यांकडून आज होईल उद्या होईल अशी उड्या उडवीची उत्तरे दिली असल्याचे पाटील यांनी म्हटले असुन , तरी नगर परिषद प्रशासनाने या संदर्भात त्वरित दखल घेवुन घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे थकीत हप्ते वितरीत करावे तसे न झाल्यास आपण नगर परिषद कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा ईशारा पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील निवेदनाद्वारा दिला आहे.