शरद पवारांनी केले संघाच्या कार्यपद्धतीचे कौतुक

sharad pawar new 696x447

पुणे (वृत्तसंस्था) ‘जनसंपर्क कसा असावा, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज दिला.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आजपासून विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. पुण्यातील भोसरी मतदारसंघातून याची सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार यांनी संघ स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले. त्यासाठी एका खासदारांनी सांगितलेला किस्साच त्यांनी ऐकवला. ‘आरएसएस’चे सदस्य कसा प्रचार करतात? हे लक्षात घ्यायला हवे. ते पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि त्यातले एखादे घर बंद असले तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. हे त्यांच्याकडून शिकायला हवे,’ असेही ते म्हणाले.  ‘लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवे. आतापासून भेटत राहिलात तर ऐनवेळी आठवण आली का ? असा प्रश्न निवडणुकीच्या वेळी मतदार विचारणार नाहीत, असे पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content