पवार साहेब उभे राहिले तर निवडणूक लढणार नाही : उदयनराजे

71092138

 

सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी अर्ज दाखल केला तर मी ही निवडणूक लढवणा नाही. मला शरद पवार यांच्याबद्दल खूप आदर आजही आहे,’ असे भावुक उद्गागार राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांनी काढले. यावेळी उदयनराजेंच्या डोळ्यात चक्क अश्रू आले.

 

काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले उदयन यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान, उदयनराजे यांच्याविरोधात खुद्द शरद पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर उदयन यांनी आज वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. शरद पवारांबद्दल कालही आदर होता. आजही आहे आणि उद्याही राहील. आज महाळ म्हणजेच पूर्वजांची आठवण काढण्याचा दिवस आहे. पवार हे मला वडिलधाऱ्यांच्याच स्थानी आहेत. ते निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही. अर्ज भरणार नाही,असे त्यांनी सांगितले.

Protected Content