एरंडोल पंचायत समितीच्या सभापतीपदी शांताबाई महाजन

WhatsApp Image 2020 01 02 at 7.15.47 PM

एरंडोल, प्रतिनिधी | पंचायत समितीच्या सदस्यांची विशेष सभा पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार अर्चना खेतमाळी यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार २ जानेवारी रोजी होऊन सभापतीपदी शांताबाई सखाराम महाजन यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आली तर उपसभापतिपदी अनिल रामदास महाजन यांची फेरनिवड करण्यात आली.

एरंडोल पंचायत समितीच्या सभापतीपद हे सर्वसामान्य महिला निघाले असून आज झालेल्या विशेष सभेत तळई गणातील पं. स. सदस्य शांताबाई महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आली. तसेच उत्राण गणातील पं. स. सदस्य महाजन यांची उपसभापतीपदी परत निवड करण्यात आली. याप्रसंगी पं. स. सदस्य विवेक पाटील, मावळते सभापती रजनी सोनवणे, निर्मलाबाई मालचे यांच्यासह सर्व सहाच्या सहा सदस्य उपस्थित होते.निवाड जाहीर झाल्यानंतर सभापती दालनात आमदार चिमणराव पाटील, पारोळ्याच्या माजी नगराध्यक्षा नलिनी पाटील, जिल्हा बँक संचालक अमोल पाटील व इतर मान्यवरांचे हस्ते नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, वैशाली गायकवाड, जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले व हिंमत पाटील, रमेश महाजन, किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, जगदीश पाटील, शालिक गायकवाड, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, मोहन सोनवणे, निर्मला मालचे, प्रभाकर पाटील, बबलू पाटील, कुणाल महाजन, चिंतामण पाटील, विजय ठाकूर , कमलेश पाटील, रवी चौधरी, रवी जाधव, संजय पाटील, सुदाम राक्षे, दत्तू पाटील, अमोल भावसार, देवेंद्र पाटील, रवी पवार, आरिफ शेख, पारोळ्याचे उपनगराध्यक्ष मंगेश तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. या पंचायत समितीवर,चार सदस्य शिवसेनेचे असल्यामुळे हा शिवसेनेचा गड मानला जातो. बाकी दोन सदस्यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने अजुन भर यात पडली आहे.

Protected Content