शाम दीक्षित खून प्रकरण : पंचनामा पूर्ण ; मृतदेह शव विच्छेदनासाठी रवाना

7ceb8d89 4fe4 4bb8 8c3d c5025f1fa5f7

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी आरोपीचे नाव माहित पडले असल्याचे सांगितले.

 

शहरातीलशहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा पहाटे खून झाल्याचे उघडकीस आले होते. शाम हा महसूल खात्यातील खासगी कामे करत होता. तसेच तो एका राजकीय पक्षाशी संबंधीत होता. दरम्यान, पोलीस तपासात शाम दीक्षितसह याने चार जणांसह शहरातील बस स्थानक लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये पहाटेवाजेपर्यंत मद्य प्राशन केले होते. यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री सोबत मद्यपान करणाऱ्या दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीतून मुन्ना नामक तरुणाचे नाव समोर आले असून हा तरून गणेश वाडीत राहत असल्याचे कळते. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह थोड्याच वेळापूर्वी शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे. तर पत्रकारांशी बोलतांना अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, आम्हाला आरोपीचे नाव समजले आहे. प्रथमदर्शी मद्याच्या नशेत खून झाला असल्याचा अंदाज आहे. पोलीस लवकरच आरोपींना पकडण्यात यशस्वी होतील.

Protected Content