चाळीसगाव प्रतिनिधी । माध्यमिक शाळेच्या इ. ७ वीच्या शालेय नागरिक शास्त्र पुस्तकात शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्याबद्दल एकेरी भाषाच्या वापर करण्यात आल्यामुळे यात तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजपूत करणी सेनेकडून करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शाळेच्या इ. ७ वीच्या नागरीक शास्त्र शालेय पुस्तकातील दुस-या धड्यातील पान नं.५ व ६ या शिवपुर्णकाली भारताचे या धड्यांमध्ये महाराणा प्रतापसिंह यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरली आहे. खरे पाहता अशा थोर महापुरुषांबद्दल एकेरी भाषा वापरणे चुकीचे आहे. पुस्तकात एकेरी भाषेचा वापर केल्यामुळे समस्त हिंद बांधव भारत वासियांच्या व राजपूत बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे तीव्र निषेध करत, लवकर सुधारणा करण्यात यावी. अन्यथा योग्य ती कार्यवाही करुन माफी मागावी लागेल. असे न झाल्यास राजपूत करणी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.