
फैजपूर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या खिरोदा येथील रहिवाशी तथा सध्या नाशिक येथे वास्तव्यात असलेला शकुंत कुणाल चौधरी यास के.सी.महिंद्रा स्कॉलरशिप जाहीर झाली आहे.
के.सी.महिंद्रा स्कॉलरशिप परदेशी शिक्षणासाठी दिली जाते. या स्काॅलरशिप अंतर्गत शकुंतला ४ लाख रुपये दिले जाणार आहेत. शकुंत हा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.ई झालेला असून आता तो नेदरलॅबस मधील वाॅगेनिंगे या जगप्रसिद्ध विद्यापीठात पर्यावरण व ऊर्जा या विषयात एम.एस करणार आहे. स्काॅलरशिपसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा व फाऊंडेशनचे विश्वस्त उपस्थित होते. शकुंत हा महिंद्रा नाशिक येथील पेंट विभागाचे डी.जी.एम कुणाल चौधरी यांचा मुलगा तर जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी यांचा पुतण्या आहे. या यशाबद्दल माजी आ.शिरीष चौधरी यांनी शकुंतचे अभिनंद केले आहे.