शाहूनगरातून गतीमंद तरुण बेपत्ता

MISSING

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहूनगर परिसरातील अल्ताफ खान २२ वर्षीय गतीमंद तरुण दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी कोणाला काहीही न सांगता निघून गेला असून कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतू तो मिळून न आल्याने त्याचे वडील वहीद खान रसूल खान यांच्या खबरीवरून आज दि. 11 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी शहर पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दरम्यान अल्ताफ याच्यावर गेल्या काही दिवसांपासून मानसोपचार तज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरु असल्याची माहिती कुटुंबियांनी पोलीसांनी सांगितले. अल्ताफ याच्याबाबतची माहिती मिळाल्यास शहर पोलीस स्टेशनचे राजेंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content