शाहीरी व विविध लोककलेनी रंगला महाराष्ट्राची लोकधारा..

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेमध्ये आपल्या शाहिरीने नवचैतन्य निर्माण करणारे पद्मश्री शाहीर कृष्णाराव साबळे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालय व कान्ह ललीत कला केद्र यांच्या सहकार्याने

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त शाहिरी पोवाडा व शाहीर साबळे यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकणा-या शाहिरी  परिसंवादाचे आयोजन सकाळी 11 वाजता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाचा शुभारंभ जेष्ट रंगकर्मी शंभु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कॉलेजचे प्राचार्य डॉ संजय भारंबे तर प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय विभागाचे अधिक्षक राजेश कांबळे  उपस्थित उपस्थित मान्यवरांचे स्वागत कान्ह ललीत कला केन्द्र चे समन्वयक शशीकांत वडोदकर यांनी केले . कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर शिवाजीराव पाटील, शंभू पाटील, प्राचार्य डॉ संजय भारंबे, शशीकांत वडोदकर आदी मान्यवरांनी पद्मश्री शाहीर साबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळेला श्री शंभू पाटील यांना पद्मश्री विखे पाटील स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल एम. जे. कॉलेजच्या वतीने व खानदेश लोक कलावंत विकास परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

 

महाराष्ट्राच्या लोककला आणि लोक संस्कृती चा जागर करणारा महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ शाहीर विनोद ढगे व सहकारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपल्या शाहीरी पोवाड्याने प्रारंभ केला आपल्या दर्जेदार शाहीरी पोवाडा व लोकगितातून शाहीर साबळे यांच्या स्मृतींना मानवंदना अर्पण केली. नंतर शाहीर शिवाजीराव पाटील यांनी ऐतिहासिक सामाजिक पोवाडा यातून स्फूर्तीदायक विषयांवर प्रकाश टाकला व शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करून उपस्थित रसिकांना व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

 

या कार्यक्रमात पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकणा-या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या परिसंवादात लोककलेचे अभ्यासक तथा प्रतिषठान महाविद्यालय पैठण येथील मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ हंसराज जाधव मु जे महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉ विद्या पाटील व  प्रा डॉ योगेश महाले यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून शाहिरी साबळे यांच्या जीवन कार्याचा माहिती उपस्थित कला रसिक विद्यार्थी यांना करून दिली

 

गण, बतावणी शाहीरी पोवाडा लोकगिते मुक्त नाट्य या विविध लोककलानी रगंलेला व शाहीर शिवाजीराव पाटील व शाहीर विनोद ढगे सह पंचवीस कलावंताच्या संचात सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने शाहीर विनोद ढगे आणि सहकारी यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक शाहीर विनोद ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन व सुत्रसंचलन प्रा डॉ योगेश महाले यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे संगित विभागाचे प्रा कपिन शिगणे प्रा देवेद्र गुरव, नाट्य विभागाचे वैभव मावळे नृत्य विभागाचे प्रा अजय शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले

 

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री बाबुराव मोरे शाहीर सुरज राऊळ जितेंद्र भांडारकर भूषण पवार यश चव्हाण दुर्गेश आंबेकर सचिन महाजन अवधूत दलाल अरविंद पाटील सुदर्शन पाटील मोहीत पाटील यांनी योगदान दिले कॉलेजचे शिक्षक प्राचार्य व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content