Home Cities चाळीसगाव शाहीद पटेल यांची मक्का येथे आरोग्यसेवक म्हणून निवड

शाहीद पटेल यांची मक्का येथे आरोग्यसेवक म्हणून निवड

chalisgaon news
chalisgaon news

chalisgaon news

चाळीसगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील पाडळसा येथील मूळ रहिवासी व हल्ली चाचा नेहरू हॉस्पिटल नवी दिल्ली येथे सेवा कार्यरत असलेले शाहिद शब्बीर पटेल यांची भारत सरकार आरोग्य विभागाकडून सौदी अरेबिया येथील मक्का शहरात हजयात्रा करण्यासाठी देशभरातून आलेले भाविक यांची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी निवड झाली आहे.

काल रात्री ते नवीदिल्ली येथून विमानाने मक्का शहराकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांना निरोप व शुभेच्छा देण्यासाठी शब्बीर पटेल, शरीफ पटेल, आरिफ पटेल, सुलतान पटेल, मासुम पटेल, महमूद पटेल, सलीम पटेल, युनुस पटेल, सिकंदर पटेल, इम्रान पटेल, इरफान पटेल हे उपस्थित होते. शाहिद पटेल हे पत्रकार मुराद पटेल यांचे मामे भाऊ आहेत.


Protected Content

Play sound