शाहिद कपूर जखमी, १३ टाके

Shahid Kapoor

 

मुंबई प्रतिनिधी । बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण शूटिंगदरम्यान शाहिद जखमी झाल्याची माहिती समोर आली असून शाहिदच्या ओठांवर बॉल लागल्याने त्याचा ओठ फाटले आहे. ओठांवर तब्बल १३ टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे.

शाहिद कपूर हा फलंदाजीचा सराव करत होता. त्याचवेळी चेंडू अचानक उसळला आणि त्याच्या चेहऱ्यावर येऊन आदळला. चेंडू त्यांच्या ओठांवर लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या ओठांवर टाके पडले आहेत. जखमांमुळे त्याच्या ओठांना सूज आली आहे. जोपर्यंत ओठांवरील जखम बरी होत नाही, तोपर्यंत तो शूटिंगला जाऊ शकणार नाही, असे सांगण्यात येत आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिदच्या ओठांवर १३ टाके पडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्याची पत्नी मीरा चंदीगड पोहोचली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, या चित्रपटात शाहिदच्या वडिलांची भूमिका पंकज त्रिपाठी साकारत आहे. तर सुपर ३० नंतर जर्सीमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे. हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२० रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Protected Content