मनपा, नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

34582 7th pay commission image source

 

मुंबई (वृत्तसंस्था) मनपा, नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे.2 सप्टेंबरपासून नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

 

आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी जोर लावून धरली होती.

Protected Content