पुण्यात भरदिवसा सात दरोडेखोरांनी सराफ दुकान लुटले

पुणे -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात भरदिवसा सराफ दुकानावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात तरूणांनी थेट सराफ दुकानात घुसून हाती बंदूक घेऊन सराफ दुकान लुटले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, पुण्यातील महंमदवाडी रस्त्यावर सात जणांच्या टोळीने एका सराफ दुकानावर दरोडा टाकून तब्बल ४०० ग्रॅमचे सोने लुटून नेल्याची घटना घडली आहे. त्या सात दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सराफ दुकान लुटले आणि पसार झाले. बीजीएफ ज्वेलर्स असे सराफ दुकानाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली असून पोलिस त्याचा आधार घेत दरोडेखोरांचा शोध घेत आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयांवर गुन्हा दाखल करण्यात आल्या आहे.

Protected Content