नवी दिल्ली वृत्तसंस्था । जानेवारी महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली असून ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने इंग्लंडमधील या वर्षी झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सात खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात प्रथम तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठीचा संघ आज जाहीर करण्यात आला. वर्ल्ड कपमध्ये संघात असलेल्या ग्लेन मॅक्सवेल, नाथन लायन, मार्कस स्टोयनिस या खेळाडूंना निवड समितीने डच्चू दिला आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या मार्नस काबुशेन याला १४ जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. जोश हेजलवुडचा पुन्हा संघात समावेश झाला आहे. भारत दौऱ्यात अॅरॉन फिंच ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल. तर अॅलेक्स कॅरी आणि पॅट कमिंस उपकर्णधार असतील. संघात पाच जलद गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. तर अॅडम जंपा आणि अॅश्टन अॅगर या फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
असा आहे वनडे दौरा
पहिली वनडे- १४ जानेवारी, मुंबई
दुसरी वनडे- १७ जानेवारी, राजकोट
तिसरी वनडे- १९ जानेवारी, बेंगळुरू