समृध्दी महामार्गावर दोन कारच्या धडकेत सात जण ठार

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृद्धी महामार्गावर जालना कडवंची गावाजवळ दोन वाहनांच्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच.१२. एमएफ. १८५६) आणि ईरटीका कार (क्र. एमएच. ४७. बीपी. ५४७८) यांच्यात भीषण अपघात झाला. ईरटीका कार नागपूरहून मुंबईकडे निघाली होती. तर, स्विफ्ट डिझायर कार डिझेल भरून विरुद्ध दिशेने येत होती. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा अशरक्ष: चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर समृद्धी माहामार्गावर वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या साह्याने दोन्ही कार बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. फयाज शकील मंसुरी, फैजल शकील मंसूरी, अल्थमेश मंसूरी , प्रदीप लक्ष्मण मिसाळ, संदीप माणिक बुधवंत, विलास सुभाष कार्यदे असे मृतांची नावे आहेत. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकले नाही. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Protected Content