जळगाव प्रतिनिधी । सेवानिवृत्त अभियंत्याकडे पन्नास लाखांची खंडणी व जिवे ठार मरण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सेवानिवृत्त अभियंता रविंद्र मधूकर मोरे (वय-65) रा. जिल्हा परिषद कॉलनी यांच्याकडे 13 सप्टेंबर रोजी 2019 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जळगावातील विलास शांताराम आळंदे, स्वप्निल विलास आळंदे, निखील विलास आळंदे आणि अनिल विलास आळंदे यांनी घरात दमदाटी करून विलास आळंदे याने रविंद्र मोरे यांच्याकडे 50 लाख रूपयांची खंडणी मागीतले. खंडणी न दिल्यास मुलाला जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. तसेच स्वप्निल आळंदे, निखील आळंदे आणि अनिल आळंदे यांनी मोरे यांचा चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीसात मोरे यांच्या फिर्यादीवरून विलास आळंदे, स्वप्निल आळंदे, निखील आळंदे आणि अनिल आळंदे यांच्या विरोधात खंडणी मागीतल्याप्रकरणी भाग 5 गुरनं 173/2019 प्रमाणे भादवी कलम 385, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. ज्ञानेश्वर सपकाळे करीत आहे.