Home Cities जळगाव सेवालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सेवायात्रींचा सत्कार

सेवालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सेवायात्रींचा सत्कार

0
64

जळगाव प्रतिनिधी । संघाच्या जनकल्याण समितीतर्फे चालविण्यात येणार्‍या सेवालयाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सेवायात्रींचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला सविता कुलकर्णी (औरंगाबाद ), आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमाताई भोळे, सुमतीलाल टाटिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर प्रमुख डॉ. विलास भोळे, जनकल्याण समितीचे अध्यक्ष मनीष काबरा, कार्यवाह विनोद कोळी उपस्थित होते. याप्रसंगी रिखभलाल बाफना , किशोर सूर्यवंशी (जळगाव), डॉ. प्रभाकर कोल्हे (मोहाडी), राज मोहंमद खान सिकलकर, चंद्रकांत पाटील (वेले), डॉ. पांडुरंग पिंगळे (कासोदा), दतात्रय तावडे (कळमसरा), निंबा सैंदाणे (जळगाव) या सेवाव्रतींचा सत्कार करण्यात आला. संदीप कासार यांनी प्रास्ताविकात सेवाकार्याच्या कार्याची व प्रकल्पांची माहिती दिली. सुनील याज्ञिक यांनी पुरस्कारांर्थी सेवाव्रतींचा परिचय करुन दिला. दीपक घाणेकर यांनी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले. रेवती ठिपसे यांनी परिचय करुन दिला.

याप्रसंगी सविता कुळकर्णी म्हणाल्या की, समाज माझा आहे, ही भावना मनाशी बाळगली पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचणे हा सेवाकार्याचा उद्देश आहे. समाज परिवर्तन घडवताना राष्ट्र भक्त घडवण्याचे कार्य प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound