Home क्रीडा सेपक टाकरा सामन्यांचे पोलीस उपअधिक्षक गणापूरे यांच्याहस्ते उद्घाटन !

सेपक टाकरा सामन्यांचे पोलीस उपअधिक्षक गणापूरे यांच्याहस्ते उद्घाटन !

0
172

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व राष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध करून देण्यासाठी २४ सप्टेंबर २०२५ रोजी जळगावच्या एमजे महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात सेपक टाकरा खेळाचे जिल्हा व मनपास्तरीय सामने उत्साहात पार पडले. या सामन्यांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील संघांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सेपक टाकरा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मलिक, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवेलकर, तसेच सेपक टाकरा असोसिएशनचे सचिव इबाल मिर्झा, एमजे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, किशोर चौधरी, शेख नईम बशीर, डॉ. रणजित पाटील, वसीम मिर्झा, शहबाज शेख आणि आसिफ मिर्झा उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपअधीक्षक गणापुरे म्हणाले, “सेपक टाकरासारख्या खेळांना प्रोत्साहन दिल्याने तरुण पिढीला नवीन संधी मिळतील आणि खेळाचा सर्वांगीण विकास होईल.” या सामन्यांमध्ये जळगाव मनपा क्षेत्रातील अँग्लो उर्दू हायस्कूल, इकरा सालार नगर, पोदार इंटरनॅशनल स्कूल, रायसोनी इंग्लिश मीडियम, स्वामी विवेकानंद, विद्या इंग्लिश मीडियम, नानासाहेब आर.बी. पाटील विद्यालय या शाळांच्या संघांनी सहभाग घेतला. तसेच उर्वरित जिल्ह्यातून बी.झेड. उर्दू हायस्कूल भुसावळ, इकरा पब्लिक स्कूल मोहाडी, रायसोनी ज्युनिअर कॉलेज मोहाडी या शाळांमधील संघही सहभागी झाले होते.

या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मिळाली. भविष्यात हे खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावतील, असा विश्वास


Protected Content

Play sound