खळबळजनक : तृतीयपंथीवर अनैसर्गिक अत्याचार; पाच जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय तृतीयपंथीवर पाच जणांनी मारहाण करत अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात ३२ वर्षीय तृतीयपंथी वास्तव्याला आहे. भिक्षा व जोगवा मागून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान तिच्यावर पाच जणांनी जबरी केस ओढून अनैसर्गिकरित्याचा अत्याचार केला. त्यानंतर तिच्याजवळील दीड हजार आणि दररोजचा ७०० रूपयांचा खंडणीचा वाटा दिला नाही म्हणून मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. मारहाण करणाऱ्यामध्ये तीन पुरूष, एक महिला आणि एक तृतीयपंथीचा समावेश आहे. दरम्यान पीडीत तृतीयपंथीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला करीत आहे.

Protected Content