खळबळजनक : चोर समजून बेदम मारहाण केल्याने परप्रांतीय तरूणाचा मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वांजोळा मिरगव्हाण रोडवर उभी कारचा दरवाजा उघडत असताना त्याला चोर समजून बेदम मारहाण केल्याने परप्रांतीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मेंद्र महिपत लोधी राजपूत (वय-२९) रा.बदुरा जिल्हा झाशी उत्तर प्रदेश असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

भुसावळ तालुका पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारातील मिरगव्हाण रोडवर उभी असलेली कार धर्मेंद्र लोधी हा उघडत असताना त्याला चोर समजून संशयित आरोपी जमेरीसिंग चितोडिया, पप्पूसिंग चितोडिया दोन्ही रा. केशवनगर आणि इतर अनोळखी दोन जण अशांनी लाकडी काठी व बॅटने हातापायावर पाठीवर आणि डोक्यावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत धमेंद्र लोधी हा गंभीर दुखापत होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर मारेकरी फरार झाले. दरम्यान या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे जमेरीसिंग चितोडिया, पप्पूसिंग चितोडिया आणि इतर दोन जण असे एकूण ४ जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप हे करीत आहे.

Protected Content