जळगाव (प्रतिनिधी)। पिंप्राळा येथील तक्रारदाराकडून नवीन मीटर बसवून घेण्याच्या नावाखाली तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला आज दुपारी अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून अटक केली. यामुळे वीजमंडळ विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी कि, तक्रारदार यांनी नवीन मिटर बसवुन देण्याच्या मोबादल्यात मयुर अशोक बिऱ्हाडे, वय-31, व्यवसाय-नोकरी, वरीष्ठ तंत्रज्ञ (सीनीयर टेक्नीशियन), म.रा.वि.वि.कं.लि पिंप्राळा-2, ता. जि.जळगाव याने तीन हजारांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाचे लीस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पो.ना.मनोज जोशी, शामकांत पाटील, पो.कॉ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, अरूण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने सापळा रचून हि कारवाई केली.
तीन हजाराची लाच घेणारा वरिष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात
6 years ago
No Comments