कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे आज वयाच्या ९३ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ व्यक्तीमत्त्व हरपले आहे.
प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
एन. डी पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पुणे विद्यापीठातून 1955 साली एम.ए. केले. तर 1962 साली एल.एल.बी. केले. त्यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले. त्यानंतर 1948 साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर लढाऊ आणि धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख झाली. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहे.