नवी दिल्ली । काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पटेल यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. पटेल यांनी ट्विटमध्ये संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मी कोविड-19 (Covid-19) पॉझिटिव्ह आलो आहे. माझी विनंती आहे की जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी सेल्फ आयसोलेट व्हावं. काँग्रेस खासदार अहमद पटेल हे आताच झालेल्या पावसाची अधिवेशनात सहभागी झाले होते. राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे , ‘तपासणीत मला कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अलीकडेच माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी स्वत: ला वेगळे करावे, असं आवाहन मी करतो. अहमद पटेल यांनी नुकत्याच संसदेच्या संपलेल्या पावसाळी अधिवेशनात भाग घेतला होता.