जळगाव (प्रतिनिधी) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृध्दाश्रम, सावखेडे बु. येथे ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरीक कायदा 2007 बाबत माहिती देण्यात आली व तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांसह सर्व शंकाचे निरासन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी केले. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा गुलाब पुष्प व ज्येष्ठ नागरिकच्या माहिती पुस्तीकेचा संच देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात श्रीमती. मनीषा पाटील सहाय्यक लेखाधिकारी यांनी देखील मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मातोश्री वृध्दाश्रमाचे संचालक संजय काळे, व्यवस्थापिका छाया पाठक, सह व्यवस्थापक, मनोहर सोनवणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास समाजकल्याण विभागाच्या मनीषा पाटील, सहाय्यक लेखाधिकारी, आर. डी. पवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, महेन्द्र चौधरी, समाज कल्याण निरीक्षक, वाणी, कनिष्ठ लिपीक, चेतन वामनाचार्य, कनिष्ठ लिपीक, विशाल वसतकार, कनिष्ठ लिपीक, भरत चौधरी सहाय्यक सल्लागार, समाज कल्याण, जिल्हा परिषद, जळगाव आदि उपस्थित होते.