जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि केसीई सोसायटीचे शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे आयोजित चर्चासत्र ते बोलत होते.
क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात विविध खेळांमध्ये आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्तम खेळाडूंना नावलौकिक मिळवता येतो यासाठी खेळाडूंनी खेळाची तंत्रे सराव स्पर्धा सहभाग यात सातत्य ठेवून क्रीडा कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.
दुसऱ्या सत्रात कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी संरक्षण क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत. एनडीए पुणे या संस्थेत बारावीनंतर प्रवेश मिळाल्यास त्याला सैन्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून नियुक्ती मिळते तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशातील विविध भागातील सैनिकांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कालात सैन्य दलांनी मोठे योगदान दिलेले आहे.स्वातंत्र्यानंतर भारतावर चीन आणि पाकिस्तान या शत्रु राष्ट्रांनी केलेल्या आक्रमणामध्ये भारताने दोन वेळा यशस्वी विजय मिळविला आहे त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यात तिन्ही सैन्य दलांचे सैनिकांचे आणि अधिकारी यांचे योगदान अभूतपूर्व आहे.
तिसऱ्या सत्रात स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानामुळे अभूतपूर्व क्रांती झाली आहे. शिक्षण प्रक्रियेपासून तर सामान्य व्यवहारांपर्यंत शिक्षण, समाज, आर्थिक व्यवहार, उद्योग, व्यापार इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संगणकाचा वापर होत आहे. सातत्याने शिक्षण प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानामुळे अभूतपूर्व परिवर्तन होत आहे कोविड 19 या आजाराच्या कठीण परिस्थितीत सुद्धा शिक्षण प्रक्रिया अखंडित सुरू ठेवण्यात संगणक तंत्र विज्ञानाचा व माहितीचा मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावर उपयोग झाला आहे त्यामुळे मोठ्या शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत तसेच आदिवासी भागात सुद्धा ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण प्रक्रिया गतिमान झाली आहे. अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन व संशोधन या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होत आहे असे प्रतिपादन प्रा.अजय पाटील संगणक प्रशाळा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
चर्चासत्राच्या शेवटी प्राचार्य प्रा.साहेबराव भुकन शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा यांनी समारोपप्रसंगी स्वातंत्र्य आंदोलनात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नवीन पिढीने अध्ययन करून त्यांचे कार्य सतत प्रेरणादायी मानून कार्य केले पाहिजे. त्याचबरोबर देशामध्ये सार्वत्रिक क्षेत्रात झालेली प्रगती भौतिक बदल सामाजिक बदल सांस्कृतिक बदल अभ्यासताना भारतीय संस्कृतीचा वारसा कायम जतन केला पाहिजे याविषयी आपले मत व्यक्त केले या चर्चासत्राचे उद्घाटन मुलजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.संजय भारंबे यांनी केले. त्यांनी शिक्षण प्रक्रियेत स्वातंत्र्योत्तर काळात सर्व स्तरावर झालेले परिवर्तन महत्त्वपूर्ण असून या परिवर्तनाचा वेग वाढवून जागतिक स्तरावर असलेल्या स्पर्धेत यश संपादन करता आले पाहिजे असे सांगितले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी जिज्ञासा जिद्द जाणीव याविषयी सतत जागृत असले पाहिजे स्वतःच्या विकासाची पायवाट स्वतः निर्माण केली पाहिजे त्यामुळे परिपूर्ण अध्ययन अनुभव प्राप्त होतो असे सांगितले. प्रा.रंजना सोनवणे यांनी चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार प्रा.रामलाल शिंगाणे यांनी मानले.