जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधील सेंट्रल लायब्ररी विभागातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त ‘सेल्फी विथ बुक’ उपक्रम राबवण्यात आला.
वाचकांमध्ये पुस्तक वाचनाचा छंद वाढावा. वाचन संस्कृती वाढावी, यासाठी ‘सेल्फी विथ बुक ‘ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यात सेल्फी बरोबर एक प्रश्नावली भरून घेण्यात आली. या प्रश्नावलीनुसार ग्रंथ किती उपयोगी आहेत? हे स्पष्ट होते.
पुढच्या पिढीला काही द्यायचे असेल, तर त्यात वाचन खूप महत्वाचे आहे, हे यातून दिसून आले. वाचनाने आपण बहूश्रुत होतो. आपली जगाशी ओळख होते. आपली बौध्दीक प्रगती होते. पुस्तक वाचनाचा आनंद वेगळा असतो. तो आनंद काही ॲप मधून मिळत नाही, असे मत ग्रंथालय विभाग प्रमुख गणेश नेवे यांनी व्यक्त केले. या उपक्रमात प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रज्ञा विखार, ऍडमिनिस्ट्रॅटिव्ह डीन प्रा. डॉ. श्रीकांत तारे, दिनेश सावदेकर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.