चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या महामारीनंतर व नव्या वर्षाच्या पहिल्या अर्थसंकल्पात सर्व देशवासीयांच्या लक्ष मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे होते. जनतेच्या अपेक्षांना पुरेपूर न्याय देतील व नागरिकांवर कुठल्याही प्रकारचा बोजा न टाकता अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आज देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. असे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्यातचे आ. मंगेश चव्हाण यांनी केला आहे.
केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात प्रथमच आरोग्य क्षेत्रांवर अधिक भर देण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २४ हजार कोटी म्हणजे १३७ टक्के इतकी तरतूद करण्यात आली आहे. देशातील नागरिक सुदृढ असेल तर देश पुढे जाईल ही भावना ठेवत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनाने संपूर्ण जगाला हदबल करून ठेवले.
या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात कोरोना लसीकरणासाठी ३५००० करोड स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर दीडपट हमीभावाची तरतूद ,जलजीवन मिशन अर्थात जलसंपदा विभागासाठी २.२८ लाख कोटी, उद्योग व रोजगारासाठी ७ मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क, जगाच्या कापड उद्योगास तोडीस तोड असे ७ टेक्स्टाईल पार्क, देशाच्या धमन्या असणाऱ्या रस्ते – महामार्गांच्या विकासासाठी १ लाख १८ हजार कोटींचा निधी, रेल्वेसाठी १ लाख १० हजार कोटी आदी भरीव तरतूद करत विकासाची गती वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र व खान्देशाच्या अर्थकारणावर प्रभाव असणाऱ्या नाशिक महानगराच्या मेट्रो फेज – १ साठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद केल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. वन नेशन वन रेशनकार्ड, गरीब, मध्यमवर्गीय, लघुउद्योजक, शेतकरी व कामगार, मागासवर्गीय या सर्वांनाच न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.