स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्रजी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पटवून दिले योगाचे महत्व !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज २१ जून २०२४ रोजी योगा दिनाचे औचित्य साधत स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात योगा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेमधील सर्व विद्यार्थी क्रीडा गणवेश परिधान करून व शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा क्रीडा गणवेश परिधान करून योगा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच विद्यार्थ्यांसोबत योगा कार्यक्रमात चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला. तसेच शाळेचे प्राचार्य व्ही.के. वडस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच योगा दिनाच्या निमित्ताने विविध योग अभ्यासाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक गणेश बोदडे यांनी केले.

Protected Content