संग्रामपुर, प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात ग्रामीण भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतिय किसान सभा वतीने प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात शेगाव वरवट रोडवरील खिरोडा येथे आज (दि.८ जाने) रोजी मेन पुलाचा ताबा मिळवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात स्वाभिमानी व किसान सभातर्फे शेगाव वरवट रोडवरील खिरोडा येथे रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोकोमुळे शेगाव वरवट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रशांत डिक्कर ,योगेश मुरुख , उज्वल चोपडे ,विलास तराळे ,आशिष नांदोकार ,संतोष दाणे ,अनिल गायकवाड ,ओम मुंडाले ,प्रशांत खोडे ,श्रीकृष्ण मोडकर ,कलीमोद्दीन काझी ,संतोष गायकवाड ,प्रवीण येनकर ,सुनिल अस्वार ,शिवा पवार ,अतुल ईगळे ,प्रतीक गावंडे, महादेव चवरे, नाना अरबट, शे.अकबर शे.बुडन, सागर पहुरकर, संतोष सोनोने, रवींद्र ससाणे, पांडुरंग भिसे ,मनोहर मोरखडे ,शे.महबुब शे.महमूदसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.