अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या किसान सेलच्या कार्यकारिणीच्या तालुका कार्याध्यक्षपदी सर्जेराव पाटील तर तालुकाध्यक्षपदी कृषिभूषण महारू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्जेराव पाटील आणि महारु पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याहस्ते अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला माजी मंत्री आ. अनिल भाईदास पाटील आणि ज्ञानेश्वर महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्जेराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये प्रामाणिक आणि सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, प्रवीण पाटील, दीपक पाटील, भैय्यासाहेब पाटील, भूषण भदाणे, तारकेश्वर पाटील, पंकज पाटील यांसह अनेकांनी सर्जेराव पाटील व महारु पाटील यांचे अभिनंदन केले आहे. पक्षाच्या संघटनेला नवा उत्साह आणि दिशा देण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.