पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पोस्ट बेसिक माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श आश्रम शाळेचा माजी विद्यार्थी रुपेश आनंदसिंग पावरा याची नुकतीच इस्रो या भारतीय संस्थेत अभियंता पदावर निवड झाली आहे.
सदर विद्यार्थ्याने पहिल्यापासून या विद्यालयात शिक्षण संपादन केलेले आहे. पुढे इंजिनिअरिंगची पदवी पास झाल्यानंतर बी टेक पूर्ण करून त्याची नुकतीच इस्रो संस्थेत अभियंता पदावर नेमणूक झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानदसचिव अॅड. महेश देशमुख, व्हा. चेअरमन विलास जोशी, स्कूल कमिटी चेअरमन प्रा. भागवत महालपूरे, मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे, मुख्याध्यापक राहुल पाटील, माजी मुख्याध्यापक डी. आर. वाघ, शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी अभिनंदन केले आहे. रुपेश पावरा याचेवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.