जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोइंबतूर येथे होत असलेल्या राष्ट्रीय ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशन व जामनेर तालुका ॲथलेटीक्स असोसिएशनचा खेळाडू प्रीतेश ईश्वर सोनवणे याची १४ वयोगटात किड्स भालाफेक क्रीडाप्रकारात महाराष्ट्र संघात निवड झाली असून तो स्पर्धेत सहभागी झाला आहे.
राज्य स्पर्धा डेरवण येथे झाल्या होत्या यात त्याने सुवर्णपदक पटकाविले होते तर नुकत्याच जोधपूर राजस्थान येथे झालेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेत देखील त्याने उत्कृष्ठ कामगिरी केली होती. त्याच्या या निवडीबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.राजुमामा भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, जळगाव जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ.नारायण खडके, चेअरमन प्रा.एम.वाय.चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी, सचिव राजेश जाधव, विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा संघटना महासंघाचे अध्यक्ष मा.आमदार प्रा.चंद्रकांतआण्णा सोनवणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदिप तळवलकर व किशोर चौधरी, ज्येष्ठ क्रीडा संघटक शामभाऊ कोगटा, नितीन बरडे, डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, फारुख शेख, दिलीप गवळी, डॉ.विजय पाटील, प्रा.इकबाल मिर्झा, निलेश पाटील, सचिन महाजन, योगेश सोनवणे, प्रशांत कोल्हे, जामनेर तालुका ॲथलेटीक्स असोसिएशनचे गिरीश पाटील, दिपककुमार चौधरी, विकास पाटील, प्रा.समीर घोडेस्वार, डॉ. आसिफ खान यांनी अभिनंदन केले, असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यास जळगाव जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे भालाफेक प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू इरफान शेख यांचे मार्गदर्शन लाभले