पहूर, ता .जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन ऑफ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅडेट ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा १४ जुलै रविवार रोजी अनुभूती इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथे उत्साहात पार पडल्या.
पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या ८ खेळाडूंनी सहभाग नोंदवित ४ सुवर्ण सुवर्ण पदकांची कमाई केली आणि १ रौप्य तर १ कांस्य पदक प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले. यात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या इशांत चौधरी (९ वी) याने सुवर्ण पदक तर प्रांजली धनगर (इ.१० वी) हिने कांस्य पदक प्राप्त केले. इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सतिष क्षिरसागर (११ वी) व जागृती चौधरी (११ वी) यांनीही सुवर्ण पदक प्राप्त केले तर वेदांत क्षिरसागर याने रौप्य पदक , हर्षदा उबाळे व जयश्री घोंगडे यांचा उत्कृष्ट सहभाग राहिला. न्यू इंग्लिश स्कूलची स्वाती चौधरी ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. दरम्यान सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची १९ रोजी चंद्रपूर व २६ रोजी बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .खेळाडूंना भूषण मगरे व ईश्वर क्षिरसागर यांचे मार्गदशन लाभले. सर्व खेळाडूंचे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष बाबूराव घोंगडे , सावित्रीबाई फूले माध्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका घोंगडे मॅडम, संचालक ॲड संजय पाटील, किरण जाधव, शंकर भामेरे, प्रकाश जोशी, श्रीकृष्ण चौधरी, प्रशिक्षक सचिव राऊत यांनी अभिनंदन केले.