जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नागझिरी शिवारातून अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर महसूल व एमआयडीसी पोलीस पथक कारवाई करत असतांना चालकाने पथकाला पाहून वाहन घेवून पसार झाल्याची घटना सोमवार २४ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी २५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नागझिरी शिवारात हायवा या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिरसोली येथील ग्राम महसूल अधिकारी यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी २४ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता महसूल पथकासह एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने कारवाई करत जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नागझिरी शिवारात कारवाई केली. यावेळी पथकाने विना क्रमांकच्या हायवा वाहनावर कारवाई करत असतांना दोन्ही पथकाला पाहून चालक दिलीप पाटील रा. शिरसोली ता. जळगाव याने कारवाईच्या भीतीपोटी त्याच्यासोबत असलेले वाहन घेऊन पसारा झाला. दरम्यान या घटनेबाबत ग्राम महसूल अधिकारी अजय बिडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी २५ मार्च रोजी पहाटे पाच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील हे करीत आहे.