Home आरोग्य मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लागू राहणार

मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लागू राहणार

0
23

 

मुंबई- करोनाचा नियंत्रणात नसल्याने मुंबई पोलिसांकडून  ३० सप्टेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे.

राज्य सरकारने ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबतच मुंबईत कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही ऑर्डर दर १५ दिवसांनी होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या नित्यक्रमाचा भाग असून नवीन लॉकडाउन असल्याचा गैरसमज केला जाऊ नये असं आदेशात सांगण्यात आलं आहे.


Protected Content

Play sound