Home Cities अमळनेर माध्यमिक शिक्षणाधिकारी महाजन यांनी सहपत्निक घेतले मंगळग्रह मंदीराचे दर्शन

माध्यमिक शिक्षणाधिकारी महाजन यांनी सहपत्निक घेतले मंगळग्रह मंदीराचे दर्शन


09946cce 2c34 402d 9b21 2b92add5076e
 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मंगळग्रह मंदीराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून अनेक जण येत असतात. नुकतेच जळगावचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सहपत्नीक श्री मंगळ देव ग्रह मंदिरात अभिषेक केला.

 

 

आपल्या मनातील इच्छा पुर्ण होते, या श्रध्देने अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकार, अधिकारी बंधू व भगिनींनी भेट देऊन आपली इच्छा पुर्ण झाल्याचे बोलले जाते. जळगावचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सहपत्नीक श्री मंगळ देव ग्रह मंदिरात अभिषेक केला. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या एकूणच कार्याची माहिती दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी महाजन यांनी संस्थेतील जवळपास सर्वच काम पाहून आनंद व्यक्त करून अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound