सेकंड हँड रिक्षा २६ हजाराची अन् पोलिसांचा दंड ४७ हजार

 

auto fine

 

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) भुवनेश्वरमध्ये एका रिक्षाचालकाने २६ हजारांत काही दिवसांपूर्वी सेकंड हँड रिक्षा घेतली. पण वाहतूक नियम मोडल्यामुळे कायद्यातील नवीन तरतुदीनुसार त्याला तब्बल ४७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, हरिबंधू कान्हर रिक्षाचालकाने सात दिवसांपूर्वीच एक सेकंड हँड रिक्षा २६ हजार रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर काल पोलिसांनी त्याच्यावर दारु पिऊन रिक्षा चालवण्यासह वाहन परवाना,नोंदणी प्रमाणपत्र, विम्याची कागदपत्रे अशी अनेक कागदपत्रे नसल्याने एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा दंड त्याला ठोठावला. रिक्षाचालकाला चंद्रशेखरपूर येथील चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये दंडाची रक्कम भरण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. मी सात दिवसांपूर्वीच ही रिक्षा 26 हजार रुपयांना खरेदी केली. पोलिसांनी 47 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावत रिक्षा ताब्यात घेतलीये. हे अत्यंत चुकीचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रिक्षाचालकाने दिली. तसेच दारुच्या नशेत असल्याचा आरोप देखील त्याने नाकारला.

Protected Content