विठ्ठलवाडीत ‘त्याच’ घरात दुसऱ्यांदा चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विठ्ठलवाडी भागातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोकड लांबविण्याची घटना उघडकीला आली आहे. दरम्यान चोरी करणारे तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज मगन मेहेते रा. विठ्ठलवाडी पिंपळा परिसर हे पत्नीसह वास्तव्याला आहे. ते गोवा येथे नोकरीला असून जळगाव येथील घरी कधीकधी येत असतात. ६ मे त्यांची पत्नी अक्षयतृतीयेनिमित्त माहेरी गेल्या असल्याने त्यांच्या घराला कुलूप लावलेले आहे. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले १० हजाराची रोकड, १२ हजार ५०० किंमतीचे सोन्याचे कानातील टोंगल असा एकुन २२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान मेहेते यांच्या शेजारी राहणाऱ्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तयांनी पंकज मेहेते यांना फोन करून चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार पंकज यांनी यांनी त्यांचे मेहुणे देविदास अमृत जाधव रा. आनंदमित्र कॉलनी पिंप्राळा यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगतले. त्यानुसार देवीदास जाधव यांनी तातडीने शालक पंकज मेहेते यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडलेले आणि घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेले दिसून आले. त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. देविदास अमृत जाधव (वय-४०, रा. आनंद मित्र कॉलनी पिंप्राळा) यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवार १३ मे रोजी दुपारी  अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक संजय भालेराव करीत आहे.

 

http://विठ्ठलवाडीत बंद घर फोडून पावणे चार लाखाचा ऐवज लांबविला; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

 

http://विठ्ठलवाडीत बंद घर फोडून पावणे चार लाखाचा ऐवज लांबविला; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल३ मार्च २०२२ रोजी देखील याच घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून ३ लाख ८१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. दोन्ही चोरीच्या गुन्ह्यात असलेल्या चोरट्यांची चोरी करण्याची पध्दत सारखी असल्याने त्याचा चोरट्यांनी दुसऱ्यांदा ही घरफोडी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता झालेल्या चोरी प्रकरणात तीन संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. लवकर या गुन्ह्याचा छळा लावावा अशी मागणी केली जात आहे.

Protected Content