बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली. बारामती येथील इनोव्हेशन सेंटरच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
बारामती येथे आज सायन्स ऍन्ड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी विज्ञानाची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी , ख्यातनाम शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिप समारंभही पार पडला. फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांशी थेट संवाद मान्यवरांनी साधला.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की या सेंटरचा विज्ञानाची गोडी निर्माण करण्यात नक्कीच उपयोग होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू केले जाणार. सरकार म्हणून आम्ही पुढाकार घेऊ, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.