
मुंबई (वृत्तसंस्था) ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. तर यावर्षी विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढवण्यात आल्या आहेत.
मुंबई, पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात जागा वाढवून देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढवल्या आहेत अशी घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.