भुसावळ प्रतिनिधी । “पालकमंत्री सुरक्षित शाळा योजनेच्या” माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 300 शाळेचे काम हाती घेण्यात आले असून स्वच्छता व विद्यार्थी हितासाठी शाळांना संरक्षण भिंतीची गरज असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक व गावं स्वच्छतेचे महत्त्व सगळ्यांना पटले असून महादेव तांडा येथे जल मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे असेही माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामलाल बडगुजर हे होते.
शासन स्तरावर विविध योजना राबवल्या जातात. अनेकवेळा एकाच प्रकारच्या कामासाठी विविध योजनांद्वारे वित्त पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्मिती विविध विभागाच्या योजनांचे अभिसरण मनरेगा योजनशी करण्याचे धोरण शासन निर्णयांवये निश्चीत करण्यात आले होते. ग्रामीण भागातील शासकीय जागेवरिल वाढते अतिक्रमण, शालेय भौतिक सुविधांचे रक्षण (जसे शौचालय डिजिटल वर्ग खोल्या; सौर पेनल) समतल खेळांची मैदाने, समृध्ह वृक्षवल्ली व विद्यार्थ्यांमधे सुरक्षिततेची भावना बळावण्यासाठी सरक्षण भिंतीचे महत्व वादादित आहे.
“पालकमंत्री सुरक्षित शाळा योजनेंतर्गत” जिल्ह्यात सरक्षण भिंती बरोबर वृक्ष लागवड, डिजिटल क्लास रुम, सौर शाळा मॉडेल स्कूल अशा योजना ही राबविल्या जाणार आहेत. यावेळी जि प चे माजी सदस्य विश्वनाथ पाटील,सरपंच रामलाल बडगुजर, ग्रा पं सदस्य प्रमोद उंबरकर व इतर मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
महादेव तांडा येथे राष्ट्रीय पेजल मधून पाणीपुरवठा योजना मंजूर होती. विहिरीचे कामही पूर्ण झाले आहे मात्र शासनाच्या नवीन धोरणानुसार माणसी 55 लिटर पाणी प्रमाणे जल जीवन मिशन योजनेंतर्गत सदर गावाचा समावेश करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे महादेवतांडा वासीयांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे माजी जि. प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. यावेळी गावाच्या विकासासाठी सकारात्मक चर्चाही करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच रामदास बडगुजर ग्राम विकास अधिकारी पी.पी.झोपे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद उंबरकर , राजेंद्र पाटील रघुनाथ राठोड, ताराचंद जाधव , बाळू तवर, रमेश जाधव , परशुराम जाधव , संजय शिंदे तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले तर आभार या वार्डाचे ग्रा.पं. सदस्य प्रमोद उंबरकर यांनी मानले.