Home क्राईम शाळकरी मुलीला महापालिकेच्या टेम्पोने चिरडले

शाळकरी मुलीला महापालिकेच्या टेम्पोने चिरडले


Accident
 

परभणी (वृत्तसंस्था) येथील महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोने एका शाळकरी मुलीला चिरडले आहे. श्रुती नागोराव भराडे(१२) असे या मुलीचे नाव असून ती आपल्या वडिलांना जेवणाचा डबा देऊन घरी परत जात असतांना हा अपघात घडला.

नागोराव भराडे हे ऑटोरिक्षा चालवतात. सोमवारी ते विद्यानगर कॉर्नर येथे उभे होते. त्यांची मुलगी श्रुती ही सायकलवरून त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी आली. तिने वडिलांन डबा आणि घरून आणलेले काही पैसे दिले. त्यानंतर घरी परत निघत असतानाच वैष्णवी मंगल कार्यालयाकडून आलेल्या महापालिकेच्या कचऱ्याच्या टेम्पोचा (एम.एच.२२- एम.एम.०७१९) तिच्या सायकलला धक्का लागला. त्यामुळे ती तेथेच पडली. याच दरम्यान, टेम्पोच्या पाठीमागील भाग श्रुतीच्या डोक्याला लागल्याने जागीच रक्तबंबाळ होऊन तिचा मृत्यू झाला. घटना घडताच मोठा जमाव एकत्र आल्याचे पाहताच टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला.


Protected Content

Play sound